Satara News : गणेशोत्सव पर्यावरणपूरक करा - शेखर सिंह


कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्याबाबत दिल्या सूचना

सातारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा गणेशोत्सव जिल्ह्यात साध्या पद्धतीने व पर्यावरणपूरक असा साजरा करावा, असे आवाहन सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवाबाबतची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंडळांना ४ फूट मूर्तीची मर्यादा

श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फुट व घरगुती गणपतीकरिता २ फुटांच्या मर्यादेत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडुची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सिंह यांनी केल्या.

सामाजिक संदेशांना प्राधान्य द्या

जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. आरती, भजन, कीर्तन तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. श्री गणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी. मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

विसर्जनापूर्वी आरती घरीच करा

श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीने विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत केले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या