Satara News : डॉ. दाभोलकर खूनाच्या सूत्रधारांचे काय झाले ?


आठव्या स्मृतीदिनी महाराष्ट्र अंनिसच्या सातारा शाखेचा निवेदनाद्वारे शासनाला सवाल
 

Satara News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाच्या घटनेला आठ वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या खूनाच्या सूत्रधारांचे काय झाले ? त्यांना कधी पकडणार ? असा सवाल सातारा जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. सूत्रधारांचा तपास त्वरित लावण्यात यावा, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

डॉ. दाभोलकर यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या स्मृती जागवत याबाबतचे निवेदन जिल्हा शाखेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना देण्यात आले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने २०१६ मध्ये डॉ. वीरेंद्र तावडे, ऑगस्ट २०१८ मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे व मे २०१९ मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहे. अमोल काळे या संशयित आरोपीविरुद्ध सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखल केलेले नाही. तसेच अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयित आरोपींच्या विरुद्धदेखील अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

... अन्यथा अभिव्यक्तिला धोका 

या खूनाचा तपास डॉ. वीरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत येऊन थांबलेला आहे. या खूनामागील सूत्रधार कोण आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास होऊन डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनामागील सूत्रधार कोण आहेत हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे. अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही, याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

निवेदन देताना महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, जिल्हा कार्याध्यक्ष वंदना माने, जिल्हा प्रधान सचिव हौसेराव धुमाळ, भगवान रणदिवे, राजेंद्र पवार, विलास भांदिर्गे, अभय भांदिर्गे, शंकर कणसे, सीताराम चाळके, दशरथ रणदिवे, जयप्रकाश जाधव, डॉ. दीपक माने, दिलीप महादार, रामचंद्र रसाळ, योगिनी मगर, रुपाली भोसले, दिलीप कणसे इत्यादी उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या