नियोजित वेळेत होणार, की कोरोनामुळे पुढे ढकलणार याबाबत संभ्रम
Satara News : पुसेगाव (ता. खटाव) येथील प. पू. श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या विद्यमान विश्वस्त मंडळाचा कार्यकाल संपत आला आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी, तसेच खासगी संस्थांशी निगडित निवडणुका स्थगित केल्या जात असल्याने श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या निवडणुकीवरही कोरोनाची टांगती तलवार आहे.
सेवागिरी तीर्थक्षेत्री भाविकांची नेहमीच वर्दळ असते. यात्रा कालावधीत तर लाखो भाविक दर्शनाच्या ओढीने या ठिकाणी येत असतात. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वर्षभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून देवस्थान सामाजिक कार्यात अग्रेसर असते. त्यामुळे या संस्थेत कार्य करण्यासाठी संधी मिळावी असे अनेकांना वाटत असते. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते.
इच्छुकांकडून हालचालींना गती
गावातील प्रमुख नेते, पहिल्या फळीतील कार्यकर्ते ही निवडणूक लढविण्यास इच्छूक असतात. जिल्हा परिषदेचा पुसेगाव गट आणि पंचायत समिती गणाच्या निवडणुकीची ही रंगीत तालीमदेखील समजली जात असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असते. कोरोना रुग्णसंख्या घटू लागल्याने निवडणूक प्रक्रिया वेळेत सुरू होईल, ही शक्यता विचारात घेऊन इच्छुकांनी मतदारांशी संपर्क वाढविणे सुरू केले आहे. उमेदवारी मिळावी म्हणून काहींनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
भवितव्य तिसऱ्या लाटेवर अवलंबून
काही अभ्यासू, तसेच सामाजिक भान असणाऱ्या इच्छुकांनी देवस्थानविषयी प्रश्नांचा अभ्यास सुरू करून त्यावर उपाययोजना शोधण्यास सुरुवात केली आहे. तथापि, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्याने श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या निवडणुकीचे भवितव्य या तिसऱ्या लाटेवरच अवलंबून आहे. त्यामुळे इच्छुकांसह ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या