नवोदित आणि प्रथितयश साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्याचा आस्वाद घेणे शक्य !
Satara News : 'मराठी साहित्य डॉट कॉम'च्या माध्यमातून नवोदित साहित्यिक आणि प्रथितयश साहित्यिक यांच्या दर्जेदार साहित्याचा आस्वाद घेणे शक्य होईल. त्यासोबतच महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि मानसिक जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या संत साहित्यालाही एका क्लिकवर अभ्यासता येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ कीर्तनकार सोन्ना महाराज रामदासी यांनी केले.
ग्रामीण तसेच शहरी भागातील साहित्यप्रेमींना मुख्य धारेशी जोडण्याचे काम अविरतपणे पार पाडणाऱ्या 'मराठीसाहित्य.कॉम' या वेबसाईटच्या नवीन लोगोचे अनावरण आणि पूजन सज्जनगड येथे त्यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्यावेळी ते बोलत होते. मराठी साहित्य डॉट कॉम चे साहित्य क्षेत्रातील कार्य भविष्यात इतिहास म्हणून नोंदले जावे असा आशीर्वादही यावेळी त्यांनी दिला. या कार्यक्रमास मराठीसाहित्य.कॉम तर्फे अक्षय पुंड, अक्षय लोखंडे आणि अनमोल कुलकर्णी उपस्थित होते.
प्रारंभी मराठीसाहित्य डॉट कॉम च्या टीमने रामदास स्वामी संस्थानचे अध्यक्ष तथा अधिकारी स्वामी सु. ग. स्वामी व समर्थ वंशज भूषण स्वामी यांची भेट घेऊन त्यांना मराठी साहित्य डॉट कॉमबद्दल माहिती दिली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या