तीन दिवसांपासून होते बेपत्ता; बोरगाव पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद
Satara News : सातारा तालुक्यातील वेणेगाव येथून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या वृद्धाचा मृतदेह गावालगतच्या कृष्णा नदीपात्रात आढळला. जयसिंग लक्ष्मण सावंत (वय ८५) असे मृताचे नाव आहे. बोरगाव पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री जेवण करुन सावंत कुटुंबीय झोपी गेले. सकाळी मुलगा बाळकृष्ण सावंत यांना आपले वडील घरात आढळून आले नाहीत. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. मात्र ते न सापडल्यामुळे बेपत्ता झाल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. अशातच गावानजीक असलेल्या कृष्णा नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळल्याची माहिती तुकाईवाडीचे पोलीस पाटील सुहास काजळे यांनी बोरगाव पोलिसांना दिली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जात मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेची बोरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. हवालदार बाबा महाडिक तपास करत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या