जलजन्य साथीचा कुठलाही प्रादुर्भाव न आढळल्याने गौरव; पाटणचा डंका
Satara News : गेल्या पाच वर्षात जलजन्य साथीचा कुठलाही प्रादुर्भाव न आढळलेल्या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन विभागाच्या वतीने चंदेरी कार्ड प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील १ हजार ४१९ ग्रामपंचायतींचा समावेश असून सर्वाधिक २३० ग्रामपंचायती पाटण तालुक्यातील आहेत.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे दरवर्षी पिण्याचे पाणी स्त्रोत अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येते. यामध्ये जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये वर्षभर कुठलाही साथीचा प्रादुर्भाव झाला नाही त्या गावांना जिल्हा परिषदेच्या वतीने हिरवे कार्ड देण्यात येते. त्याचप्रमाणे सलग पाच वर्ष पाणी अस्वच्छतेचा कुठलाही प्रादुर्भाव न झाल्यास चंदेरी कार्ड देण्यात येते. यामध्ये यंदा जिल्ह्यातील १ हजार ४१९ ग्रामपंचायतींचा समावेश असून पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
सातारा तालुका दुसऱ्या क्रमांकावर
दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सर्वेक्षणात सातारा तालुक्यातील १८९ ग्रामपंचायती, कोरेगाव १३७, खटाव ११८, माण ८६, फलटण १२४, खंडाळा ५६, वाई ९७, जावली ११८, महाबळेश्वर ७९, कराड १८५, पाटण २३० या ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांनी दिली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या