Satara News : नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम अंतिम टप्प्यात


कोणीही आपद्ग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या - बाळासाहेब पाटील
  

Satara News : अतिवृष्टीमुळे पाटण, जावली, महाबळेश्वर तसेच कराड तालुक्याचा काही भाग बाधित झाला आहे. अतिवृष्टीत जीवितहानी, शेतीचे तसेच घरांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून शासनाकडे पाठविण्यात येणाNया नुकसानीच्या आराखड्यात कोणताही अतिवृष्टीबाधित वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.

अतिवृष्टी बाधित नागरिकांसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतची बैठक आज पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीस गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मदतीबाबत अधिकाNयांना सूचना

अतिवृष्टीमुळे ज्यांचे मृत्यू झाले, त्यांच्या वारसांना ५ लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. जे शेतकरी आहेत त्यांना स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विम्याच्या शासनाच्या निकषानुसार लाभ मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरु करावी. अतिवृष्टीमुळे गावांच्या पिण्याच्या पाणी योजना वाहून गेल्या किंवा ना दुरुस्त झाल्या आहेत, अशा गावांना शाखा अभियंत्यांनी प्रत्यक्ष भेटी देवून दुरुस्तीच्या खर्चाची आकडेवारी तयार करावी. अतिवृष्टीमुळे ज्यांच्या जमिनी वाहून गेल्या किंवा शेतीमध्ये मलबा आला आहे याची स्वतंत्र यादी कृषी विभागाने तयार करावी, अशा सूचना करुन पालकमंत्री पाटील यांनी केल्या.

अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या काही गावांमधील घरे मातीखाली गाडली गेली आहेत त्या गावातील नागरिकांची तात्पुरत्या निवाNयासाठी निवारा शेडची व्यवस्था लवकरात लवकर करावी. तसेच त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी प्रस्ताव करत असताना वन विभागाच्या जमिनीबरोबर खासगी जमिनीचाही पर्याय ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत केल्या.

मशिनरी कमी पडल्यास बाहेरून आणा 

अतिवृष्टीमुळे शेतीमध्ये आलेला मलबा हटविण्यासाठी मशिनरी उपलब्ध करुन द्या. जिल्ह्यातील मशिनरी कमी पडत असल्यास त्या बाहेरील जिल्ह्यातून आणा. तसेच बाधितांसाठी निवारा शेडची उभारणी करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री देसाई यांनी केल्या. अतिवृष्टी बाधित गावांमधील विहिरी गाळाने भरल्या आहेत. गाळ काढण्यासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध करुन द्या. काही गावांमध्ये सार्वजनिक विहिरींमध्ये गाळ आला आहे. खासगी विहिरी मालक गावच्या पिण्यासाठी पाणी देण्यास तयार आहेत तेथे विद्युत पुरवठा उपलब्ध करुन द्या. यामुळे गावाला स्वच्छ पाणी पिण्यास मिळेल, असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी बैठकीत सांगितले.

बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे अतिवृष्टीबाबत करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीत आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद पाटील यांनी उपयुक्त अशा सूचना केल्या.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या