Satara News : सातारा जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करा


निवडणुकीचा पैसा सभासदांसाठी वापरला तर त्यांचे कल्याण होईल - उदयनराजे
 

Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लावून खर्च करण्यापेक्षा तो पैसा शेतकरी सभासदांसाठी वापरला तर त्यांचे कल्याण होईल, अशी सूचना जिल्हा बँकेचे संचालक व खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची अप्रत्यक्ष अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, बँक व्यवस्थित चाललेली असताना बँकेला 'ईडी'कडून नोटीस का पाठविण्यात आली, असा सवालही त्यांनी केला. 

खासदार उदयनराजे भोसले हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी वेळेआधीच बँकेच्या मुख्य कार्यालयात हजर झाले. त्यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात छेडले असता, ही सर्वसामान्यांची बँक आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही, पण बँकेची निवडणूक लावून खर्च करण्यापेक्षा निवडणुकीवर खर्च होणारे पैसे शेतकरी सभासदांसाठी वापरले, तर सभासदांचे कल्याण होईल. निवडणुकीबाबत बँकेचे संचालकच ठरवतील, असे उदयनराजे म्हणाले. 

'ईडी'ची नोटीस का आली?

जिल्हा बँकेला 'ईडी'कडून आलेल्या नोटीसविषयीही त्यांनी प्रतिक्रिया दिली. जिल्हा बँकेचे कामकाज समाधानकारक आहे. ही बँक व्यवस्थित चाललेली असताना बँकेला 'ईडी'ची नोटीस का पाठविण्यात आली? त्यापेक्षा लाईन दोरीत जेवढे लोक वरपासून खालीपर्यंत आहेत, त्यांना नोटीस का आलेली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या