Satara News : हा तर निवडणुकीचा मोसमी पाऊस..!


सातारा नगरपालिकेत विकासकामांचा दुष्काळ अन भ्रष्टाचाराचा सुकाळ

Satara News : शहराचा विकास होईल या अपेक्षेने सातारकरांनी एकहाती सत्ता दिली, पण सातारकरांचा अपेक्षाभंग झाला. आता निवडणूक जवळ आल्याने विकासकामांचा पाऊस भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. सत्ताधारी थापांचा पाऊस पाडण्यात माहीर असले तरी, हा केवळ निवडणुकीचा मोसमी पाऊस आहे, असे टीकास्त्र आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सोडले आहे.

सातारा नगरपालिकेत कमिशन आणि टक्केवारीसाठी एकमेकांचे गळे धरण्याच्या ऐतिहासिक घटना सातारकरांना पाहाव्या लागल्या. गेल्या साडेचार, पावणेपाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी नगरपालिकेला फक्त लुटण्याचे काम केले. सत्ताधाऱ्यांनी अख्ख्या टर्ममध्ये भ्रष्टाचाराचा सुकाळ केला. त्यामुळे नगरपालिकेतील 'कचरा' हळूहळू हद्दपार करण्याची वेळ जवळ आली आहे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

सूचना काढल्याने भुलवण्याचा उद्योग 

सातारा विकास आघाडीत भ्रष्टाचारावरून सुरु असलेल्या कळवंडीवर पडदा टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न नेत्यांना अनेकदा करावा लागला ही वस्तुस्थिती आहे. आता निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेसंदर्भात सूचना काढल्याने सत्ताधाऱ्यांनी विकासकामांचा पाऊस दाखवून नागरिकांना भुलवण्याचा उद्योग सुरु केला आहे. निवडणूक आयोगाने सूचना थोडी उशिरा काढली असती तर सातारकरांना हा थापेबाजीचा पाऊस आज दिसला नसता, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

वर्षभरात नवीन भागासाठी काही नाही

हद्दवाढ होऊन आता वर्षभराचा कालावधी लोटला. पण हद्दवाढीतील नवीन भागासाठी एकही काम केले गेले नाही. कोरोना महामारीचा विळखा बसला असताना साधे एक आयसोलेशन सेंटर सुरु केले नाही आणि आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विकासकामांचा पाऊस पाडायला निघाले आहेत हे न समजण्याएवढी जनता काही दुधखुळी नाही, असेही शिवेंद्रराजे म्हणाले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या