Satara News : कुरिअर एजन्सीच्या आमिषाने पुणेकराला गंडा


४ लाख ९७ हजारांची फसवणूक; सातारा शहर पोलिसात गुन्हा दाखल

Satara News : कुरिअर एजन्सी द्यायची आहे, असे सांगून त्या बदल्यात घेतलेल्या चेकद्वारे बँकेतून पैसे काढून दोघांनी फसवल्याची घटना साताऱ्यात घडली. संशयितांनी तब्बल ४ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक केली असून तक्रारदार पुणे येथील आहेत. शिवाजी जाधव व पाटील (दोघांचे पूर्ण नाव, वय, पत्ता माहित नाही) अशी संशयितांची नावे आहेत. 

याप्रकरणी जितेंद्र मधुकर पारखे (वय ५३, रा. सदाशिव पेठ, पुणे) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार व संशयित आरोपींची फोनवरुन ओळख झाल्यानंतर संशयितांनी कुरिअर एजन्सी द्यायची असल्याचे सांगितले. ही ओळख व घटना दि. ११ ऑगस्ट २०२१ पासून सुरु झाल्यानंतर संशयितांनी तक्रारदार यांना माहिती व कागदपत्रे व्हॉट्सअपवर मागवून घेतली. फोनवरुन तसेच व्हॉट्सअपवरुन ओळख सुरु झाल्यानंतर तक्रारदार यांना संशयितांनी साताNयात येण्यास सांगितले.

धनादेश वटताच फोन बंद 

त्यानुसार तक्रारदार दि. २० रोजी साताऱ्यात आले. यावेळी तक्रारदार यांना संशयित शिवाजी जाधव हा भेटला. संशयिताने यावेळी पुन्हा कागदपत्रे घेवून चार चेक मागून घेतले. चेक घेतल्यानंतर संशयित तेथून निघून गेला. त्यानंतर २६ रोजी संशयितांनी बँकेत चेक भरुन ते वटवून तक्रारदार यांना कोणतीही एजन्सी न देता फसवणूक केली. तक्रारदार यांनी संशयितांना फोन लावला असता ते फोन बंद लागले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या