विभागात कोरोना बाधित रुग्ण १९.९१ लाख; ४१ हजार रुग्णांचा मृत्यू
Corona News : पुणे विभागातील १९ लाख ३९ हजार १०१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९ लाख ९१ हजार ४०० झाली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ११ हजार १८६ इतकी आहे. कोरोनाबाधित एकूण ४१ हजार ११३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण २.०६ टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९७.३७ टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा : पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित एकूण ११ लाख ३८ हजार ६५ रुग्णांपैकी ११ लाख १३ हजार २४८ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण ६ हजार ६ आहे. कोरोनाबाधित एकूण १८ हजार ८११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण १.६५ टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९७.८२ टक्के आहे.
सातारा जिल्हा : सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित एकूण २ लाख ४७ हजार ९९५ रुग्णांपैकी २ लाख ३८ हजार ९१५ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या २ हजार ८१० आहे. कोरोनाबाधित एकूण ६ हजार २७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा : सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित एकूण २ लाख १ हजार ५० रुग्णांपैकी १ लाख ९४ हजार ७७८ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या १ हजार २९७ आहे. कोरोनाबाधित एकूण ४ हजार ९७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा : सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधित एकूण १ लाख ९८ हजार १८५ रुग्णांपैकी १ लाख ९२ हजार २१४ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ६८९ आहे. कोरोनाबाधित एकूण ५ हजार २८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित एकूण २ लाख ६ हजार १०५ रुग्णांपैकी १ लाख ९९ हजार ९४६ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ३८४ आहे. कोरोनाबाधित एकूण ५ हजार ७७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधित रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये १ हजार १३३ ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात ६५६, सातारा जिल्ह्यात २०७, सोलापूर जिल्ह्यात १६५, सांगली जिल्ह्यात ८३ तर कोल्हापूर जिल्ह्यात २२ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण १ हजार २५२ आहे. पुणे जिल्ह्यात ६५६, सातारा २४९, सोलापूर १६०, सांगली १२६ व कोल्हापूर जिल्ह्यात ६१ रुग्णांचा समावेश आहे.
विभागात १.६९ कोटी नमुन्यांची तपासणी
आजपर्यंत विभागामध्ये एकूण १ कोटी ६९ लाख ९२ हजार ८३ नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी १९ लाख ९१ हजार ४०० नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
(टीप : दि. २९ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ९ पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या