अत्याचाराच्या घटना ही चिंतेची बाब; गुन्हेगारांवर वचक ठेवणे आवश्यक - डॉ. गोऱ्हे
Crimes Against Woman News : राज्य शासन महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असून महिलांवरील अत्याचाराच्या घटना ही चिंतेची बाब आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक ठेवणे आवश्यक आहे. महिला सुरक्षेबाबत पोलीस प्रशासन, महिला दक्षता समिती तसेच महिलांच्या प्रश्नांसंदर्भात काम करणाऱ्या सामाजिक संघटना यांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
साक्षीदार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, महिलांना होणाऱ्या त्रासाबाबत त्वरित माहिती मिळावी यासाठी सीसीटीव्ही संख्या वाढविणे, गस्त वाढविणे, वारंवार घटना घडणाऱ्या ठिकाणी पथदिव्यांची सोय करणे गरजेचे आहे. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने याबाबतची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे, असे सांगून, पॉक्सो कायद्याअंतर्गत प्रलंबित केसेस तात्काळ निकाली काढण्याच्या दृष्टीने पाठपुरावा सुरू असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी याप्रसंगी सांगितले.
तपास, समुपदेशनात सहभाग वाढवा
विधी व न्याय विभागाच्या संदर्भातील प्रलंबित प्रश्नांबाबत आपण मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगून, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवास करताना महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी यंत्रणा सतर्क ठेवावी. रेल्वे पोलीस, राज्य पोलीस दल यांना सीसीटीव्ही संख्या वाढविणे व ऑनलाईन देखरेख कार्यक्षम करून गुन्हे जागीच रोखणे, महिलांच्या तक्रारी लवकर समज़ून माहिती होण्यास व्हॉट्सअप ग्रूप करणे तसेच सामाजिक संघटनांचा पोलिसांच्या तपासात, पीडितांच्या समुपदेशनात सहभाग वाढविण्याबाबत सूचनाही त्यांनी दिल्या.
भरोसा सेल सक्षमीकरण, महिलांसाठी स्व मदत गटांची स्थापना, महिलांचे समुपदेशन, फॉरेन्सिक लॅबचे अहवाल वेळेत यावेत यासाठी सबंधित यंत्रणेने विशेष प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहपोलीस आयुक्त डॉ. शिसवे, पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी आपल्या क्षेत्रातील महिला सुरक्षेच्यादृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.
Crimes Against Woman
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या