Heritage News : दिल्ली विधानसभेत सापडले ऐतिहासिक भुयार



विधानसभेच्या इमारतीतून लाल किल्ल्यात जाण्याचा मार्ग; ‘ती’ खोली अद्याप बंदच !

Heritage News : दिल्ली विधानसभेच्या इमारतीत एका भुयाराचा शोध लागला असून हे भुयार दिल्ली विधानसभेपासून ऐतिहासिक लाल किल्ल्यापर्यंत जात असल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिटिश राजवटीत स्वातंत्र्यसैनिकांना जनतेपासून लपवून इकडून तिकडे घेऊन जाण्यासाठी या भुयाराचा वापर करण्यात येत होता, असा दावा दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी केला आहे. दरम्यान, दिल्ली विधानसभेत एक वधस्तंभाची खोली असून ती अद्याप उघडलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

रामनिवास गोयल यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. दिल्ली विधानसभेत या भुयाराचे एक टोक आढळले असले तरी आता तेथून लाल किल्ल्यापर्यंत जाता येणार नाही. कारण मेट्रो प्रकल्प आणि सांडपाणी वाहिन्यांसाठी झालेल्या खोदकामात हा मार्ग नष्ट झाला आहे, असे गोयल यांनी सांगितले.

ब्रिटिशकाळात कायदेमंडळ म्हणून वापर  

ब्रिटिशांनी १९१२ साली आपली राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवली, त्यावेळी संसद भवनाची उभारणी झाली नव्हती. त्यामुळे सध्याच्या दिल्ली विधानसभेच्या इमारतीचा वापर केंद्रीय कायदेमंडळ म्हणून करण्यात येत होता. संसदेचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ब्रिटिशांनी दिल्ली विधानसभेचा वापर न्यायालय म्हणून सुरू केला. त्यावेळी लाल किल्ला तुरुंग म्हणून वापरला जात होता. स्वातंत्र्यसैनिकांना सुनावणीसाठी लाल किल्ल्यातून या भुयारामार्गे न्यायालयात आणण्यात येत होते, अशी माहिती त्यांनी दिली.

अद्यापही न उघडलेली खोली 

दिल्ली विधानसभेत वधस्तंभ असलेली एक खोली असून तेथे स्वातंत्र्यसैनिकांना फाशी दिली जायची. ही खोली अद्याप उघडलेली नाही. या खोलीचे स्वातंत्र्य सैनिकांचे मंदिर म्हणून रुपांतर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे गोयल यांनी सांगितले.

Delhi Vidhan Sabha Tunnel News

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या