Mahavitaran News : धनाड्यांचा खोटा उद्योग; ३.४२ कोटींची वीजचोरी


पुणे विभागात एकाच दिवशी २२३७ ठिकाणी अनधिकृत वीजवापर उघडकीस

Mahavitaran News : ऑगस्टनंतर पुन्हा या महिन्यात एकाच दिवशी पुणे प्रादेशिक विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत महावितरणने पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये २२३७ ठिकाणी वीजचोऱ्या व विजेचा अनधिकृत वापर उघडकीस आणला आहे. तसेच नियमाप्रमाणे दंड व चोरीच्या वीजवापरासह सुमारे ३ कोटी ४२ लाख रुपयांच्या वीजबिलांची वसुली सुरु करण्यात आली आहे. या बिलांचा भरणा न करणाNया वीजचोरांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. 

पुणे प्रादेशिक विभागात वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध नियमित कारवाई सुरु आहे. सोबतच वीजचोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांच्या निर्देशानुसार एक दिवसीय विशेष मोहीम घेण्यात येत आहे. ऑगस्टमध्ये ही विशेष मोहीम घेण्यात आली. त्यानंतर पुन्हा ११ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता या मोहिमेला सुरूवात करण्यात आली. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी शेकडो अभियंता व कर्मचाऱ्यांनी विविध पथकांद्वारे वीजचोरीविरोधात कारवाई सुरु केली.

२०.६६ लाख युनिटची वीजचोरी 

यामध्ये दिवसभरात पाचही जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदिंच्या १८ हजार ३७ वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २२३७ ठिकाणी वीजचोऱ्या व अनधिकृत वीजवापर आढळून आला. या मोहिमेत सुमारे २० लाख ६६ हजार युनिटची वीजचोरी झाल्याचे प्राथमिक तपासणी दिसून आल्याने त्याची वसुली करण्यासाठी सुमारे ३ कोटी १८ लाख २५ हजार रुपयांचे वीजबिल संबंधित ग्राहकांना देण्यात येत आहेत. नियमाप्रमाणे दंड व वीजचोरीचे बील न भरल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा परस्पर जोडून घेत किंवा अन्य ठिकाणाहून वीजवापर करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध सुद्धा या मोहिमेत फौजदारी कारवाई करण्यात आली.

सधन व सुशिक्षित चोऱ्यांमध्ये आघाडीवर

या विशेष मोहिमेत पुणे जिल्ह्यात १०६६ ठिकाणी १ कोटी ९५ लाख ५७ हजार, सातारा जिल्ह्यात १४१ ठिकाणी ११ लाख ५३ हजार, सोलापूर जिल्ह्यात ६४७ ठिकाणी ६२ लाख ६० हजार, कोल्हापूर जिल्ह्यात १८२ ठिकाणी ४१ लाख ११ हजार आणि सांगली जिल्ह्यामध्ये २०१ ठिकाणी ७ लाख ४३ हजार रुपयांच्या वीजचोऱ्या व अनधिकृत वीजवापर आढळून आला आहे. उघडकीस आलेल्या वीजचोऱ्या विशेषत: सधन व सुशिक्षित घरगुती, व्यावसायिकांसह कृषीग्राहकांकडील आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या