सर्जापूरमध्ये विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी शिवेंद्रराजे यांचे आवाहन
Satara News : आपण कोणत्याही पक्षात असलो तरी विकासकामांत कुठेही अडचण आलेली नाही आणि कधी येणारही नाही. जे लोक तालुक्यात कार्यरत आहेत, तुमच्या सुखदु:खात तुमच्यासोबत आहेत त्यांच्या बरोबर, त्यांच्या पाठीशी ठाम राहा. मृगजळाप्रमाणे बाहेरून येणाऱ्यांच्या पाठीमागे धावू नका, असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
जावली तालुक्यातील सर्जापूर येथे ग्रामपंचायतीच्या नूतन बहुउद्देशीय इमारतीचे भूमीपूजन तसेच बर्गे वस्ती रस्ता खडीकरण, सटवाई रोडचे डांबरीकरण व लसीकरण शिबिराचे उद्घाटन अशा विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास जावलीचे उपसभापती सौरभ शिंदे, अरूणा शिर्के, जयदिप शिंदे, प्रकाश मोहिते, सरपंच स्वागता बोराटे, उपसरपंच शंकर मोहिते, देविदास बोराटे, मयुर बाबर, सारिका मोहिते, सुरेखा मोहिते, मनिषा बोराटे यांच्यासह ग्रामस्थ व महिला आदी उपस्थित होते.
कधीच भेदभाव केला नाही
विकासकामात आपण कधीच सातारा जावली असा भेदभाव केला नाही व कधी करणारही नाही. विकास कामांबरोबरच तालुक्यातील सर्व अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातत्याने केला आहे. तुमच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी आपण कायम तत्पर असून जो खऱ्या अर्थाने तुमची कामे करतो त्याच्या पाठीशी कायम रहा, असे आवाहन शिवेंद्रराजे यांनी यावेळी केले. अतुल बोराटे यांनी सूत्रसंचालन केले. नितिन मोहिते यांनी प्रास्ताविक केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या