केवळ धार्मिक विधी होणार; पोलीस प्रशासन व ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय
Satara News : शेकडो वर्षांची परंपरा असणारा सातारा तालुक्यातील अंगापूर येथील पारंपारिक श्री आत्म गजाननाचा भद्रोत्सव यंदाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात केवळ धार्मिक विधी करुन उत्सव होणार असल्याचे पोलीस प्रशासन व ग्रामस्थांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन व ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, शेकडो वर्षांची परंपरा सलग दुसऱ्या वर्षीही खंडित होणार आहे. मागील दीड वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने प्रशासनाने मंदिरे तसेच उत्सव, यात्रांना बंदी घातली असून, सर्वत्र १४४ कलम लागू करण्यात आले आहे. याच कालावधीत अंगापूरचा भद्रोत्सव होत आहे.
मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत उत्सव करा !
या अनुषंगाने सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे, उपनिरीक्षक श्रीकांत देव, अंगापूर वंदनच्या सरपंच वर्षा कणसे, उपसरपंच हणमंत कणसे, अंगापूर तर्फच्या सरपंच मनीषा शेडगे, उपसरपंच विशाखा शेडगे दोन्ही गावचे ग्रामपंचायत सदस्य, पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार याही वर्षीचा भद्रोत्सव साध्या पद्धतीने व मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या