१४.८५ लाख नागरिकांना पहिला, तर ५.८७ लाख नागरिकांना मिळाला दुसरा डोस
Satara News : सातारा जिल्ह्यातील महा लसीकरण अभियानात सर्वाधिक लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य झाले. जिल्ह्यात या अभियानात साडेचारशेहून अधिक केंद्रांच्या माध्यमातून १ लाख १७ हजार ८०० नागरिकांचे लसीकरण केले गेले. राज्यभरात लसीकरणात मुंबईनंतर सातारा जिल्ह्याचा क्रमांक लागला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ लाख ८५ हजार ४९९ नागरिकांनी पहिला डोस, तर ५ लाख ८७ हजार ९२७ नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून लसीकरण मोहिमेत सातारा जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यात 'कोव्हिशिल्ड'ची १ लाख ४७ हजार ४००, तर 'कोव्हॅक्सिन'चे ६ हजार ४०० डोस उपलब्ध झाले होते. त्यामुळे आरोग्य विभागाने महा लसीकरण अभियान राबवीत सर्वाधिक लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले होते.
सर्वाधिक लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण
लसीकरण सुरु झाल्यापासून आतापर्यंत एकाच वेळी सर्वाधिक ९० हजार लस जिल्ह्याला उपलब्ध झाली होती. त्यानंतर आज महा लसीकरण अभियानात सर्वाधिक लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले. या अभियानात जिल्ह्यातील सातारा, कराड, फलटण, वाई व कोरेगाव या पाच ठिकाणी ऑनलाइन नोंदणीनुसार, तर इतर ठिकाणी टोकन पद्धतीने लसीकरण प्रक्रिया पार पडली.
जिल्ह्याला लशींचे डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने महा लसीकरण मोहिमेत १ लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले. या मोहिमेसाठी लसीकरण सत्रांचीही संख्या वाढविण्यात आली होती. जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असे लसीकरण विभागाचे नोडल अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांनी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या