डीसीसीच्या सर्वागीण कामकाजाची दखल घेवून उत्कृष्ठ कार्यक्षमतेचा गौरव
Satara News : जिल्हा बँकांच्या कृषि व ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासामधील महत्वपूर्ण योगदानासाठी नाबार्डने उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या जिल्हा बँकांना पुरस्काराने सन्मानित करण्याचे निश्चित केले आहे. विविध निकषांच्या आधारावर सातारा जिल्हा बँकेच्या सर्वागीण कामकाजाची दखल घेवून 'उत्कृष्ठ कार्यक्षमता' पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. या पुरस्काराचे नाबार्डचे जिल्हा प्रतिनिधी सुबोध अभ्यंकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले, संचालक अनिल देसाई, प्रकाश बडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे, राजीव गाढवे उपस्थित होते.
सातव्यांदा उत्कृष्टतेवर शिक्कामोर्तब
नाबार्ड व जिल्हा बँकेचे अतुट नाते असून बँकेने सलग ६ वर्षे 'उत्कृष्ठ कार्यक्षमता' पुरस्कार मिळवला आहे. नाबार्डमार्फत दिला जाणारा देशपातळीवरील हा ७ वा पुरस्कार आहे. बँकेच्या आदर्शवत कामकाजाची देशभर ख्याती आहे. यामुळेच नाबार्डचे चेअरमन डॉ. जी. आर. चिंताला यांनीही नाबार्डच्या वरिष्ठ व्यवस्थापनासह बँकेस भेट दिली होती, असे उद्गार आमदार शिवेंद्रराजे यांनी यावेळी काढले. सातारा जिल्हा बँक आर्थिक प्रगती बरोबरच सामाजिक बांधिलकी जपत आहे. नाबार्डने याच कार्याची दखल घेत बँकेला गौरविले आहे, असे अभ्यंकर म्हणाले.
संचालक मंडळाने आखून दिलेली ध्येय धोरणे व त्याची प्रभावी अंमलबजावणी, शेतकऱ्यांची बँकेवर असलेली निष्ठा, आर्थिक शिस्त यामुळे बँक प्रगतीपथावर पोहचली असल्याचे डॉ. राजेंद्र सरकाळे यावेळी म्हणाले. या पुरस्काराबद्दल बँकेचे ज्येष्ठ संचालक, विधान परिषद सभापती रामराजे नाईक - निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, संचालक सदस्य यांनी अभिनंदन केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या