Satara News : पोल्ट्री सल्लागार डॉ. के. आर. कुलकर्णी कालवश


पोल्ट्री व्यवसायाला उर्जितावस्था मिळवून देणारा सच्चा मार्गदर्शक हरपला

Satara News : कराड येथील प्रख्यात पोल्ट्री सल्लागार डॉ. कमलाकर रघुनाथ तथा के. आर. कुलकर्णी (वय ८२) यांचे वृध्दापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

कराड येथे संगम हॉटेलच्या मागील बाजूस पी. डी. पाटील उद्यानाजवळ डॉ. कुलकर्णी यांचे वास्तव्य होते. त्यांनी कल्याणी फार्म, शाहू कुक्कुटपालन संस्था (वारणा कोडोली) यांचे सल्लागार म्हणून प्रदीर्घकाळ काम पाहिले होते. सातारा, सांगली तसेच कोल्हापूर जिल्ह्यात पोल्ट्री व्यवसाय वृध्दिंगत होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. या व्यवसायात नव्याने येणाऱ्यांना सल्ला देऊन व मार्गदर्शन करून त्यांनी नेहमीच पाठबळ दिले. त्यामुळे पोल्ट्री उद्योगात त्यांचे नाव आदराने घेतले जात होते. 

त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. महेश कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या