Satara News : जेईई मेन परीक्षेत ‘दिशा अ‍ॅकडमीचे’चे घवघवीत यश


तब्बल ७५ टक्के विद्यार्थी ठरले जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र

Satara News : नीट, जेईई, सीईटी अशा विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या वाईतील दिशा अ‍ॅवॅâडमीच्या विद्यार्थ्यांनी जेईई मेन २१ परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यंदाच्या वर्षी दिशाचा सक्सेस रेशिओ ७५ टक्के आहे. परीक्षेला बसलेल्या ९५ विद्यार्थ्यांपैकी ७१ विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. शुभम पडवळ (९८.४६ परसेन्टाईल), ओम वाईकर (९७.०९), मंदार दिघे (९६.७३), ओमकार लुंगे (९६.४२), राहूल डांगे (९५.४६) हे विद्यार्थी अव्वल स्थानी आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये १५ विद्यार्थ्यांनी ९० परसेन्टाईलपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत, तर ४० विद्यार्थ्यांनी ८० परसेन्टाईलपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. लक्ष बॅचमधील २५ पैकी २५ विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत.

कोरोनाकाळात वाढवले मनोधैर्य 

संकटाच्या काळात मन स्थिर ठेवून उद्दिष्टाकडे वाटचाल करण्यात खरा कस लागतो. पण विद्यार्थ्यांनी घेतलेले कष्ट आणि दिशातील तज्ञ अनुभवी शिक्षकांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे तसेच कोरोनाच्या या संकट काळात विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्याच्या केलेल्या प्रयत्नांचे एकत्रित यश जेईई मेन परीक्षेच्या निकालातून समोर आले आहे, असे सांगत, दिशा अ‍ॅवॅâडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाबरोबर शैक्षणिक क्षेत्रासाठी भरीव कामगिरी करण्यासाठी दिशा सातत्याने प्रयत्न करेल असेही त्यांनी नमूद केले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या