शारीरिक - मानसिक छळ व १ कोटी मागितल्याची कराड शहर पोलिसात सुनेची तक्रार
Satara News : सुनेला शिवीगाळ, मारहाण करत तिच्याकडे एक कोटीची मागणी केल्याप्रकरणी कोल्हापूरमधील काँग्रेसचे वजनदार नेते, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील, त्यांचा मुलगा तसेच मुलगी यांच्याविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरे पी. एन. पाटील, पती राजेश पांडुरंग पाटील व नणंद टीना महेश पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
आदिती राजेश पाटील यांनी याबाबतची तक्रार पोलिसात दिली आहे. पती, सासरे व नणंद यांनी संगनमत करुन शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला तसेच फसवणूक करणे, शिवीगाळ करून मारहाण करणे, धमकी देणे याबद्दल ४९८ अ, ४१७, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ अशा विविध कलमांन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब पाटील यांची पुतणी
आदिती या राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची पुतणी व सुभाष पांडुरंग पाटील (रा. वाखाण रोड, कराड) यांची मुलगी असून सध्या वडिलांकडे वास्तव्यास असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. खुद्द विद्यमान आमदारांच्या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
P. N. Patil Sadolikar News
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या