पोवई नाक्यावरील शाखेच्या उद्घाटनप्रसंगी उदयनराजेंनी दिल्या शुभेच्छा
Satara News : आपल्या गुणवत्तेमुळे सातारचे नाव साता समुद्रापार नेणारे चंद्र विलास भुवन हा साताऱ्याचा अस्सल ब्रँड असून सातारा, पुणे, नवी मुंबईनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हॉटेल चेनच्या माध्यमातून या 'चंद्र विलास'चे विस्तारीकरण व्हावे, अशा शुभेच्छा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्या.
पोवई नाक्यावरील रजताद्री कॅम्पस येथे चंद्र विलास रेस्टो व डायनिंग हॉलचे शानदार उद्घाटन श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, प्रकाश गवळी, अरूण गोडबोले, बाबाशेठ तांबोळी, रमेशशेठ शानभाग, अॅड दत्ता बनकर, नगरसेवक किशोर शिंदे, संजय शिंदे, विजय बडेकर, राजेंद्र चोरगे, नागठाणे येथील आल्याचे व्यापारी श्रीराम कुलकर्णी, जोशी यांच्या मातोश्री इंदुमती जोशी, प्रविण जोशी, प्रपुâल्ल जोशी, चंद्र विलास रेस्टोचे भागीदार संचालक वसंतशेठ जोशी, किरणशेठ जाधव, काका धुमाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मिसळ व सातारकरांचा जुना ऋणानुबंध
चंद्र विलास परिवारात वसंतशेठ जोशी, त्यांचे बंधू आणि त्यांच्या वडिलांनी अहोरात्र कष्ट करून शून्यातून विश्व निर्माण केले. गेली सात दशके चंद्रविलासची रुचकर खाद्य सेवा हा सातारकरांच्या काळजाचा ठेवा आहे. मॅकडोनॉल्ड प्रमाणेच चंद्र विलास भुवनच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्र व देशभर होतील अशा सदिच्छा यावेळी उदयनराजे यांनी दिल्या. चंद्रविलासच्या मिसळीची चव आणि सातारकर यांचा जुना ऋणानुबंध आहे. पूर्वीच्या काळी शासकीय अधिकारी वेळात वेळ काढून चंद्रविलासची चटकदार मिसळ खायला येत असत. जुने चंद्र विलास हॉटेल हे सातारच्या जुन्या आठवणींचे आणि अनेक संदर्भांचे साक्षीदार आहे. चंद्र विलास परिवाराची अशीच प्रगती होत राहो अशा शब्दात श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. चंद्र विलास भुवनने सातारकरांसाठी खास सादर केलेले नव्या स्वादाचे खाद्यपदार्थ सातारकरांना निश्चित पसंत पडतील, असा विश्वास वसंतशेठ जोशी यांनी यावेळी व्यक्त केला.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या