Satara News : चाफळ फरशी पुलाच्या साहित्याची परस्पर विक्री


प्रकरणाची सखोल चौकशी करून पैसे वसूल करण्याची ग्रामसभेत मागणी

Satara News : पाटण तालुक्यातील चाफळ येथील उत्तरमांड नदीवर नवीन फरशी पूल बांधण्यासाठी पाडलेल्या जुन्या फरशी पुलाचे लोखंडी साहित्य परस्पर भंगारात विकल्याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधिताकडून त्या विक्रीतून आलेले पैसे ग्रामपंचायतीने वसूल करावेत अशी मागणी चाफळ ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली आहे.

अलीकडेच नदीवरील जुना फरशी पूल पाडून नवीन फरशी पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यावेळी पाडलेल्या पुलाचे लोखंडी साहित्य संबंधिताने ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर भंगारात विकले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व संबंधित व्यक्तीकडून पैसे वसूल करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सरपंच आशिष पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसेवक राजेंद्र चोरगे, उपसरपंच सुरेश काटे, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

ताब्यात न देता विकले भंगारात 

नवीन पुलाचे काम करताना संबंधित व्यक्तीने जुन्या पुलाचे लोखंडी साहित्य ग्रामपंचायत अथवा बांधकाम विभागाच्या ताब्यात देणे गरजेचे होते. मात्र, संबंधित व्यक्तीने कोणालाही विश्वासात न घेता ते भंगारात विकले. त्याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. सभेत गावातील विविध विकास कामांच्या विषयांवरही सखोल चर्चा करण्यात आली. सुरेश काटे यांनी आभार मानले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या