Satara News : २.३८ कोटी सातारा पालिकेकडे वर्ग करण्यास मंजुरी


नव्याने हद्दवाढीत आलेल्या भागांसाठी आधी आलेला निधी नगरपालिकेला मिळणार
 

Satara News : सातारा शहराची हद्दवाढ होण्यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेस १५ व्या वित्त आयोगाने पूर्वीच्या शाहूपुरी, विलासपूर, खेड या ग्रामपंचायतींकरिता प्राप्त झालेला सुमारे २ कोटींपेक्षा जास्त निधी नगरपरिषदेकडे वर्ग करण्यास हसन मुश्रीम यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष, खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

याबाबत खासदार उदयनराजे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की केंद्राने ग्रामीण विकासासाठी १५ व्या वित्त आयोगामधून बंधित निधीचा पहिला हप्ता ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तराकरिता १०:१०:८० या प्रमाणात वितरित केला होता. दरम्यानच्या काळात संपूर्ण शाहूपुरी, विलासपूर, खेड, दरे या ग्रामपंचायतींचा भाग सप्टेबर २०२० मध्ये सातारा नगरपरिषदेमध्ये समाविष्ट करण्यात येवून सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला.

हद्दवाढ भागांसाठी होणार उपयोग

तथापि, १५ व्या वित्त आयोगामधून देण्यात आलेला निधी संबंधीत यंत्रणेकडेच जमा होता. हा निधी हद्दवाढ झाल्याने नगरपरिषदेला वितरित करण्याबाबत ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दि. २४ ऑगस्ट रोजी आणि त्यापूर्वी प्रस्तावित केले होते. त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार नुकतीच हा सुमारे २ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी नगरपरिषदेकडे वर्ग करण्यास मुश्रीफ यांनी मंजुरी दिली आहे. लवकरच जिल्हा परिषदेच्या स्तरावरुन हा निधी नगरपरिषदेकडे वर्ग केला जावून हद्दवाढ भागातील कामे पूर्ण करण्यासाठी जादा निधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या