सातारा येथे जेलफोडो शौर्यदिनाचे आयोजन; हुतात्म्यांना करणार अभिवादन
Satara News : सातारा येथील मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतीवरुन सहकाऱ्यांच्या मदतीने उडी मारुन क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हे भूमिगत झाले होते. त्यांनी ऐतिहासिक उडी मारल्याच्या या घटनेला दि. १० सप्टेंबर २०२१ रोजी ७७ वर्षे पूर्ण होत असून, यानिमित्ताने त्यादिवशी सातारा येथे जेलफोडो शौर्यदिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या औचित्याने स्वातंत्र्यसंग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या हुताम्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, वैभवकाका नायकवडी तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
क्रांतीकारकांमुळे ब्रिटिशांची दमछाक
कार्यक्रमाची माहिती देताना वैभवकाका नायकवडी म्हणाले, ब्रिटिश राजवट उलथवून टाकण्यासाठी स्थापलेल्या प्रतिसरकारच्या माध्यमातून नागनाथअण्णा नायकवडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध मोहिमा राबविल्या होत्या. सातत्यपूर्ण कारवाया करत त्यांनी ब्रिटिश राजवटीची दमछाक केली होती. यानंतरच्या काळात ब्रिटिश सरकारने नागनाथअण्णा नायकवडी यांना पकडले व त्यांची रवानगी ईश्वरपूर येथील कारागृहात केली. मात्र या ठिकाणी त्यांना ठेवणे धोक्याचे असल्याने ब्रिटिश सरकारने त्यांना सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात हलवले.
सातारच्या मध्यवर्ती कारागृहात कैदेत असताना क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी दि. १० सप्टेंबर १९४४ रोजी कारागृहाच्या भिंतीवरुन सहकाऱ्यांच्या मदतीने उडी मारत भूमिगत झाले होते. या ऐतिहासिक घटनेस शुक्रवार दि. १० रोजी ७७ वर्षे पूर्ण होत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या