Satara News : शेती अवजारे चोरणारी टोळी शिताफीने जेरबंद


शिरवळ पोलिसांची कामगिरी; चौघांना अटक करून ४.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Satara News : खंडाळा तालुक्यातील नायगाव परिसरात शेती अवजारे चोरणारी टोळी सोलापूर येथे जावून जेरबंद करण्यात शिरवळ पोलिसांना यश मिळाले असून, यातून रोटावेटर व पिकअप असा एवूâण ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. 

नायगाव येथील परमेश्वर दशरथ नेवसे व संतोष लक्ष्मण नेवसे या दोघांचेही शेतातून रोटावेटर चोरीस गेल्याची फिर्याद दाखल केल्यानंतर जिल्हा पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी उपनिरीक्षक राजकुमार भुजबळ, सागर अरगडे, प्रमोद दीक्षित, पांडुरंग हजारे, अमोल जगदाळे व स्वप्नील दौंड यांची टीम तयार करुन तपास केला असता टोमॅटोचे व्यापारी म्हणून परिसरात फिरणाऱ्यांनी ही चोरी केल्याचा संशय घेऊन सीसीटीव्हीद्वारे तपास करुन ही टोळी पानीव (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील असल्याचे निष्पन्न झाले.

सोलापूर जिल्ह्यात मुसंडी 

एकूण चार जणांनी शेती अवजारे गाडी (एमएच ४५ एएफ ०५५०) मधून चोरुन घेऊन गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सीताराम लक्ष्मण येडगे, उमाजी शिवाजी मदने, ज्ञानेश्वर अनिल जाधव व विशाल रामचंद्र मदने (सर्व रा. पानीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांना शिरवळ पोलिसांनी सोलापूर येथे जावून ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस पांडुरंग हजारे करीत आहे.

Satara - Solapur Crime News

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या