Satara News : क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णांच्या शौर्याला मानवंदना


जेल फोडण्याच्या स्मरणदिनानिमित्त सातारा कारागृहासमोरील स्मृतीस्तंभास अभिवादन

Satara News : देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, त्यातील सहभागी माणसे आपल्यासाठी आदर्श आहेत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु असतानाच पद्मभूषण, क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचीही जन्मशताब्दी सुरु आहे. अण्णांनी सातारा जेल फोडून ब्रिटिश व्यवस्थेला धक्का दिला. आपल्यासाठी अतिशय अभिमानास्पद आणि आदर्शवत असा हा प्रसंग आहे, असे गौरवोद्गार वाळवा येथील हुतात्मा संकुलाचे प्रमुख वैभव नायकवडी यांनी काढले.

स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी मोलाचे योगदान दिले आहे. ब्रिटिशांनी त्यांना कैद करुन सातारा जेलमध्ये ठेवले होते. मात्र, दि. १० सप्टेंबर १९४४ रोजी त्यांनी जेलच्या भिंतीवरून उडी मारून पलायन करत ब्रिटिशांना झटका दिला होता. त्या घटनेला शुक्रवारी ७७ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील हुतात्मा सहकारी साखर कारखाना, हुतात्मा शिक्षण संकूल, हुतात्मा परिवाराच्या वतीने सातारा येथे 'जेलफोडो शौर्य दिन' साजरा करुन जेलबाहेर असणाऱ्या स्मृतीस्तंभास अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

स्फूर्तिदायी घोषणांनी परिसर दणाणला

या अभिवादन कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, शिराळा पंचायत समितीचे उपसभापती बी. के. नायकवडी, वीरधवल नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, जेलफोडो शौर्यदिन कार्यक्रमावेळी 'भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा विजय असो, प्रतिसरकारचा विजय असो, पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा झिंदाबाद, क्रांतिसिंह नाना पाटील झिंदाबाद, हुतात्मा किसन अहिर झिंदाबाद, हुतात्मा नानकसिंग झिंदाबाद आदी घोषणांनी सातारा शहर पोलीस ठाणे आणि जिल्हा कारागृह परिसर उपस्थितांनी दणाणून सोडला.

स्वातंत्र्याच्या लढाईत हजारो तरुण सहभागी झाले होते. प्रत्येकजण जीवाची पर्वा न करता लढत होता. आता थांबायचे नाही असा ध्यास मनी बाळगत देश स्वतंत्र झालाच पाहिजे या ध्येयाने हजारो तरुण पछाडले होते. त्यांच्या लढाईला यश आले. त्यांच्या योगदानामुळेच आपण स्वतंत्र देशात सुखाने नांदत आहोत, असे वैभव नायकवडी यावेळी म्हणाले. क्रांतिवीर नागनाथअण्णा आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीरअण्णा हे एक अनोखे नाते होते. या दोघांचे कर्तृत्व देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहायला हवे. त्यांच्या कर्तृत्वाला आमचा सलाम आहे, असे डॉ. अनिल पाटील म्हणाले.

सातारची भूमी अन्यायाविरूध्द लढणारी

सातारची भूमी अन्यायाविरोधी लढणारी आहे. स्वराज्य निर्मितीची खरी लढाई याच भूमीतून सुरु झाली. क्रांतिसिंह नाना पाटील यांची प्रतिसरकार चळवळ ब्रिटिशांविरोधात आक्रमकपणे उभी राहिली, लढली. नागनाथअण्णांचे यामध्ये मोठे योगदान आहे, असे उद्गार जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी यावेळी काढले. यावेळी बी. के. नायकवडी, विजय मांडके यांचीही भाषणे झाली.  यावेळी गणेश दुबळे, सुनेत्रा भद्रे, भगवानराव पाटील, बाळासाहेब पाटील, प्रा. विलास ढगे, अजित वाझे, संभाजीराव थोरात, दादासाहेब चव्हाण, सुभाष मोटे, आनंदराव सूर्यवंशी, जनसंपर्क अधिकारी शिवाजी पाटील, प्रदीप पवार, रमेश आचरे, प्रा. हसीम वलांडकर, जयकर चव्हाण आदी उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या