Satara News : कोरोना मंदावला; जिल्ह्यात २५२ नवे बाधित


पॉझिटिव्हिटी रेट २.११ टक्क्यांवर; दिवसभरात ६३० जणांना डिस्चार्ज

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे संकट आटोक्यात आल्यासारखी स्थिती आहे. कारण ११९५५ टेस्टमध्ये केवळ २५२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. आजचा पॉझिटिव्हिटी रेट २.११ टक्के इतका आला आहे. त्याचप्रमाणे आज दिवसभरात ६३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आज एकाही मृत्यूची नोंद नाही.

तथापि, गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असून बाजारपेठा गर्दीने फुलल्याचे दिसत आहे. लोकांच्यामधील कोरोनाची भीती काहीशी कमी झालेली दिसून येत असून मास्कचा वापरही कमी झालेला आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर रूग्ण पुन्हा वाढतील की काय अशी धास्ती अनेकजण बोलून दाखवत आहेत.  

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ० (९९१४), कराड २२ (३८५४८), खंडाळा ५ (१३९९३), खटाव ३६ (२५०३४), कोरेगाव ३० (२१५३७), माण १३ (१७३९२), महाबळेश्वर ६ (४६४२), पाटण ६ (१०१३४), फलटण ७२ (३६१८१), सातारा ५४ (५०४९६), वाई ५ (१५५९९) व इतर ३ (२०१२) याप्रमाणे आजअखेर एकूण २४५४८२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - १९५६७८३
  • एकूण बाधित - २४५४८२
  • घरी सोडण्यात आलेले - २३४८०९
  • मृत्यू - ६०२२
  • उपचारार्थ रुग्ण - ७६०१

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या