दि. २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत टपाल खात्याकडून मिळणार 'घरपोच' सुविधा
Satara News : आपल्या ओळखीचा महत्त्वाचा पुरावा असलेल्या आधार कार्डला आपला मोबाईल क्रमांक आता घरबसल्या लिंक करता येणार आहे. यासाठी टपाल कार्यालयाकडून जिल्ह्यात दि. २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आधार आणि मोबाईल लिंकिंग मोहीम राबविली जाणार आहे. विशेष म्हणजे टपाल कार्यालयासह पोस्टमनकडून ही सेवा घरपोच उपलब्ध केली जाणार आहे.
आधार कार्ड हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे ओळखपत्र आहे. अगदी सीमकार्डपासून ते घर घेण्यापर्यंत आधार कार्डची गरज भासते. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड लागतेच. आधार कार्डची ओळख झाल्यापासून त्यात अनेक बदल झाले. त्याचप्रमाणे आधारला मोबाईल क्रमांक लिंक करणे बंधनकारक करण्यात आले. आधारला मोबाईल क्रमांक लिंक नसल्यास पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना काढताना अडचणी येतात.
मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन
त्यामुळे टपाल कार्यालयाने दि. २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आधार आणि मोबाईल लिंकिंग मोहिमेचे नियोजन केले आहे. आधार लिंकिग जवळच्या टपाल कार्यालयात केले जाणार आहे. शिवाय पोस्टमनच्या माध्यमातूनही ही सेवा घरपोच उपलब्ध केली जाणार आहे. या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल विभागाच्या प्रवर अधीक्षक अपराजिता मिश्रा यांनी केले आहे.
Aadhar - Mobile Linking
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या