Satara News : सातारा जिल्हा बँकेची प्रारूप मतदारयादी प्रसिध्द


एकूण मतदार १९६३; हरकती व आक्षेप घेण्यासाठी १३ सप्टेंबरची डेडलाईन

Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची प्रारूप मतदारयादी शुक्रवारी प्रसिध्द करण्यात आली. या यादीनुसार जिल्हा बँकेसाठी १९६३ इतके मतदार असून यावर हरकती आणि आक्षेप घेण्यासाठी दि. १३ सप्टेंबरपर्यंत आपले म्हणणे सादर करायचे आहे. दरम्यान, ही प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाल्यामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणाला गती आली आहे. तसेच सातारा तालुक्यात सर्वाधिक ४१६ इतके मतदान असल्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत पुन्हा एकदा सातारा तालुक्याला महत्त्व राहणार आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा अद्याप झाली नसली, तरी प्रारूप मतदार यादी शुक्रवारी प्रसिध्द करण्यात आली. सातारा येथील उपनिबंधक कार्यालयात याबाबत माहिती देण्यात आली. यावरील हरकती सादर करण्यासाठी दि. १३ सप्टेंबरची मुदत असून त्यावरील निर्णय दि. २२ रोजी देण्यात येणार आहेत. यानंतर अंतिम मतदार यादी ही दि. २७ सप्टेंबर रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.

सातारा तालुक्यात सर्वाधिक मतदान

प्रारूप मतदार यादीनुसार सातारा जिल्हा बँकेसाठी १९६३ मतदार आहेत. यापैकी कृषी पतपुरवठा गटातून ११ उमेदवार निवडून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अन्य पाच मतदारसंघ असून राखीव प्रवर्गातही पाच जागा आहेत. तालुकानिहाय मतदानाचा विचार करता सातारा तालुक्यात सर्वाधिक ४१६ मतदान असून त्याखालोखाल कराड तालुक्यात ३३२ मतदान आहे. फलटण तालुक्यात २८०, वाई १३२, खंडाळा ८८, जावली ६९, महाबळेश्वर ४८, कोरेगाव १३१, खटाव १५० तर माण तालुक्यात ११५ मतदान आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या