रस्ता निसटून गेलेल्या ठिकाणी केले ‘काँक्रिट’ काम; वाहतूक होणार पूर्ववत
Satara News : जुलैमधील तुफान पर्जन्यवृष्टीमुळे दरीत सामावून गेलेला महाबळेश्वर ते पोलादपूर मार्गावरील अंबेनळी घाटरस्त्याच्या दुरुस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून गणरायाच्या आगमनासोबतच या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग कामाला लागला आहे.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. त्या तडाख्यात अंबेनळी घाटातील रस्ता काही ठिकाणी पूर्णपणे दरीत कोसळला असून अनेक ठिकाणी मोठमोठ्या दरडी कोसळल्याने २१ जुलैपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.
केवळ दीड महिन्यात दुरुस्ती
सातारा जिल्ह्याला रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्याशी जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे ती लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील आहे. रस्ता वाहून गेलेल्या ठिकाणी काँक्रिट टाकण्याचे काम सुरू आहे. केवळ दीड महिन्यात रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण होत असून, त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होणार आहे.
पर्यटन व्यवसाय घेणार उभारी
Mahabaleshwar - Pratapgad - Poladpur - Ambenali Ghat
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या