Satara News : दुर्गम भागात पोलीस वसाहतीसाठी प्रस्ताव द्या


शासन स्तरावर पाठपुरावा करणार; राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे आश्वासन

Satara News : दुर्गम भागातील पोलिसांसाठी कामकाजाच्या ठिकाणी नजीक राहण्यासाठी घर असणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस विभागाने अशा दुर्गम भागातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस वसाहत बांधण्यासाठी प्राधान्याने प्रस्ताव तयार करुन सादर करावा. त्याचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. 

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोNहाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्ह्यातील सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पोलीस स्टेशन उभारणीबाबतचाही प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही देसाई यांनी दिल्या.

विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त ठेवा 

येत्या ५ ऑक्टोबरपासून शाळा व महाविद्यालये सुरु होत आहेत. त्यादृष्टीने विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी महिला पथदर्शी प्रकल्पामधून बंदोबस्त ठेवावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण शाळेतील विद्यार्थींनींच्या स्वसंरक्षणासाठी प्रत्येक तालुक्यासाठी किमान १० तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक करुन त्यांना प्रशिक्षण द्यावे. तसेच समाज कल्याण विभागाने आश्रमशाळेतील मुलींनाही स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या