‘बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाचे स्वागत; विधिपूर्वक प्राणप्रतिष्ठापना
Satara News : सातारा शहर तसेच जिल्ह्यात आज अपूर्व उत्साहात 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात विघ्नहर्त्या गणरायाचे स्वागत करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकांना फाटा देत साधेपणाने पण विधिपूर्वक गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना केली. जिल्ह्यात जवळपास ६४१ गावांमध्ये 'एक गाव एक गणपती' बसवण्यात आला आहे.
जिल्ह्यात पावसाचे वातावरण असल्याने व अधूनमधून पावसाची रिमझिम होत असल्याने काही लोकांनी कालच गणेशमूर्ती घरी आणल्या आहेत. तर अनेकांनी आज झब्बा - पायजमा - टोपी अशा पारंपरिक वेशभूषेत 'गणपती बाप्पा मोरया' असा गजर करत अत्यंत उत्साहाने गणरायाला घरी आणले. गणरायाच्या आगमनामुळे सर्वत्र मंगलमय वातावरण पहायला मिळाले. घरोघरी मोठ्या प्रमाणात आरास करण्यात आली असून सोशल मीडियावर या सजावटीच्या फोटोंचा 'आमच्या घरचा बाप्पा' या टॅगलाईनखाली अक्षरश: पाऊस पडला आहे.
संकटातही उत्साह कायम
जिल्ह्यात जवळपास ४५८५ मंडळांची नोंद असून पैकी ६४१ गावात 'एक गाव, एक गणपती' बसवण्यात आले आहेत. कोरोनाच्या सावटात यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव झाकोळून गेला असला तरी लोकांच्यातील उत्साह कायम आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या