भोंदवडेतील शेतकरी मेळाव्यात मनसे व भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
Satara News : पाणी उशाला आणि कोरड घशाला अशीच काहीशी परिस्थिती या भागाची झाली आहे. जलसंधारणाचे मोठे चार प्रकल्प या भागात असले तरी शेतीसाठी पाण्याचा तुटवडा हे येथील लोकप्रतिनिधींचे अपयश असल्याची टीका करत, या भागातील धरणग्रस्तांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडून शंभर टक्के मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
सातारा तालुक्यातील भोंदवडे येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी परळी भागातील मनसे तसेच भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कृषीमंत्र्यांच्या हस्ते नित्रळ येथील अतिवृष्टी आपद्ग्रस्त नंदा वांगडे यांना रोख स्वरूपात अर्थसाह्य करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानुगडे - पाटील, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा उपप्रमुख सचिन मोहिते, नारायण निकम, श्यामराव लोटेकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक शारदा जाधव, रंजना भोसले, एकनाथ ओंबळे, अनिल गुजर, अतिश ननावरे, विश्वनाथ धनावडे, बाळासाहेब शिंदे, निलेश मोरे, सचिन जवळ, प्रणव सावंत, रुपाली लेंभे, मंजिरी सावंत, अमर माहिते, हनुमंत भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.
खंबीर नेतृत्त्वाअभावी प्रश्न प्रलंबित
पीकविमासंदर्भात शिवसेना नेहमी आग्रही राहिली आहे. तसेच पंधरा दिवसांच्या आत कर्जमुक्तीचा निर्णय घेतला होता. शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली. मात्र या परळी भागातील नेतृत्व खंबीर नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत, असे प्रतिपादन नितीन बानुगडे - पाटील यांनी यावेळी केले.
धरणग्रस्तांची व्यथा कधी समजणार ?
या मतदारसंघात चार मोठी धरणे बांधलेली आहेत. पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत आहे. धरणे तयार होऊन वीस वर्षे झाली तरी स्थानिक नेत्यांना या धरणग्रस्तांची व्यथा कधी समजणार असाच प्रश्न उभा राहत आहे. धरणे बांधून वीस वर्षे झाली तरी वर सरवूâन राहिलेल्या लोकांचा शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न तसेच धरणाच्या खाली असलेल्या शेतीसाठी कालव्याचा पाणीप्रश्न प्रलंबितच आहे. कारण खाली कालवा नाही आणि वरच्या भागासाठी पाइपलाइन नाहीत. मग हा शासनाकडून आलेला सर्व निधी गेला तरी कुठे, यासंदर्भातही चौकशी नक्कीच झाली पाहिजे, असे सचिन मोहिते म्हणाले. यावेळी परळी खोऱ्यातील विविध विभागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या