Satara News : सैनिक भरतीसाठी युवकांचे ठिय्या आंदोलन

Photo By Pramod Ingale

कोरोनामुळे भरती ठप्प; खासदार उदयनराजे यांनी जाणून घेतल्या व्यथा

Satara News : सैनिक भरती होत नसल्याच्या कारणास्तव असंख्य युवकांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. शासनाने लवकरात लवकर सैनिक भरती करावी तसेच या सैनिक भरतीसाठीची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवावी अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे.

मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन शासनाने सैनिक भरती केलेली नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊनदेखील परवानगी मिळत नसल्यामुळे सैनिक भरतीसाठी तयारी करणाNया युवकांमध्ये निराशा येत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी कॉम्रेड सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने मोठ्या संख्येने एकत्र येऊन युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केले.

आंदोलनस्थळी उदयनराजेंची भेट

दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन भरतीबाबत सर्व समस्या समजावून घेतल्या. यावेळी या युवकांमध्ये चैतन्य पहायला मिळाले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या