अधिकृतपणे वितरणाधीच काहींना मिळाले; काही शाळा अद्यापही वंचित
Satara News : आधीच कोरोना संकटामुळे शाळा बंद असताना सप्टेंबर महिना संपत आला तरी पाठ्यपुस्तकांचा पत्ता नसल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या काळजीने पालकांना ग्रासले आहे. त्यात आता मसूर केंद्रासाठी आलेली पाठ्यपुस्तके काही मुख्याध्यापकांनी अधिकृतपणे वितरण होण्याआधीच परस्पर नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही पुस्तके केंद्रप्रमुखांच्या संमतीने नेली, की संमतीविना हा प्रश्न असून संमतीविना नेली असतील तर संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई होणार काय याची चर्चा शिक्षक वर्गात रंगली आहे.
सलग दुसरे शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांना घरी काढावे लागत आहे. त्यामुळे शिक्षणाची हेळसांड होत असून या पिढीच्या भवितव्याचे काय याची काळजी पालकांना लागली आहे. त्यात शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पाठ्यपुस्तके सप्टेंबर महिना निम्मा संपून गेला तरी मिळू शकली नाहीत. त्यामुळे काळजीत भरच पडली आहे. असे असताना कराड तालुक्यातील मसूर केंद्रासाठी पाठ्यपुस्तकांचे संच आले आहेत. तेही विद्यार्थी संख्येइतके आले नसल्याचे वृत्त आहे. एका शाळेत हे संच ठेवले असल्याची माहिती काही मुख्याध्यापकांना मिळाल्याने (की मर्जीतल्यांना दिली गेली ?) त्यांनी संबंधित ठिकाणी धाव घेतली.
आणखी किती काळ प्रतीक्षा करायची?
अद्याप पुस्तकांच्या वितरणाविषयी अधिकृत नियोजन झाले नसताना, तसा काही कार्यक्रम ठरला नसताना संबंधितांनी परस्पर त्यांना हवे असलेले संच नेले. याची बातमी शिक्षक वर्तुळात पसरल्यानंतर अन्य शाळांमध्ये अस्वस्थता पसरली. कारण मसूर केंद्रात १३ शाळा असून त्यापैकी मोजक्याच शाळांना ही पुस्तके मिळाली असून अन्य शाळांसाठी शिल्लकच राहिलेली नाहीत. आता या शाळांना विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार असा सवाल विचारला जात आहे.
अधिकृत वितरणाचे ठरले नसताना संबंधितांना पुस्तके नेण्यास कोणी परवानगी दिली, दिली नसेल तर त्यांनी परस्पर कशी नेली, संबंधितांच्या बाबतीत शिक्षण विभागाची भूमिका काय राहणार याची चर्चा शिक्षक वर्तुळात रंगली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या