Satara News : दुचाकीवरून पाठलाग करून युवतीला मारहाण


भावांनाही धक्काबुक्की; सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल

Satara News : सातारा शहर परिसरात राहणाऱ्या युवतीचा दुचाकीवरुन पाठलाग करत तिला व तिच्या भावांना शहर वाहतूक शाखेसमोर मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संबंधित युवती दुचाकीवरुन राजवाडा येथून पोवई नाक्याकडे निघाली होती. यावेळी बॉबी अ‍ॅन्थोनी ब्रुक्स, पवन दत्तात्रय जाधव व एका अल्पवयीनने (रा. सातारा) तिचा पाठलाग सुरु केला. पाठलाग करत असतानाच त्या तिघांनी युवतीला उद्देशून अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. यास सोबत असणाऱ्या युवतीच्या भावाने आक्षेप घेतला. युवती दुचाकीवरुन सातारा शहर वाहतूक शाखेजवळ आली असतानाच ब्रुक्स, जाधव यांनी युवतीची दुचाकी अडवली. दुचाकी अडवल्यानंतर त्या तिघांनी युवतीला खाली खेचत धक्काबुक्की, तसेच शिवीगाळ केली. ही भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या त्या युवतीच्या भावांना तिघांनी मारहाण केली तसेच त्यांच्याकडे असणाऱ्या मोबाईलची तोडफोड केली.

पोलीस आले मदतीसाठी धावून

रस्त्यावर सुरु असणारा गोंधळ पाहून वाहतूक पोलीस त्याठिकाणी आले व त्यांनी युवती, तिच्या भावांची हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका करत मारहाण करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. यानंतर त्यांना सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याची तक्रार त्या युवतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली असून, ब्रुक्स, जाधव यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचा तपास उपनिरीक्षक उस्मान शेख करीत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या