Satara News : मृत पत्रकारांच्या कुटुंबांना मदतीसाठी प्रयत्न करणार


सातारा जिल्हा पत्रकार संघाला माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर यांची ग्वाही

Satara News : मराठी पत्रकार परिषदेच्या सातारा जिल्हा पत्रकार संघाने सुचवल्यानुसार सातारा जिल्ह्यातील कोरोनाने मृत झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबाना केंद्र सरकारच्या 'पीआयबी'मार्फत मदत करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करु. ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शन योजनेच्या प्रलंबित प्रश्नांचा तातडीने निपटारा करु. ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासंदर्भातही पाठपुरावा करु, अशी ग्वाही पुणे विभागाचे नूतन माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर यांनी दिली

सातारा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने सातारा जिल्हा माहिती कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, जीवनधर चव्हाण, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, दूरचित्रवाणी सहनियंत्रण समितीचे सदस्य तुषार तपासे, सोशल मिडियाचे अध्यक्ष सनी शिंदे, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे ओंकार कदम, अमित वाघमारे, भाऊ चिंचकर, विकास धुळेकर उपस्थित होते.

तात्काळ निर्णय घेतला जावा - पाटणे

यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे म्हणाले, कोरोना कालावधीत जिल्ह्यातील मृत्यू पावलेल्या पत्रकारांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा पत्रकार संघाने पत्र दिले आहे. मात्र अद्याप त्यावर काहीच झाले नाही. त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी यावर तात्काळ निर्णय घेतला जावा. राज्य व केंद्र शासनाच्या योजनांमधूनही मदत मिळावी. 

ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन योजना लागू करण्यास विलंब होत आहे. त्याबाबतही सकारात्मक भूमिका घेऊन राज्य शासनाकडे याबाबत पाठपुरावा करावा. ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृतीची खरी गरज आहे. त्यामुळे अधिस्वीकृती निकषांमध्ये योग्य ते बदल करून जास्तीत जास्त पत्रकारांना त्याचा लाभ होण्यासाठी निर्णय घेतला जावा असे हरीष पाटणे यांंनी सुचवले.

प्रश्नांची सोडवणूक करण्यास प्राधान्य

यावर डॉ. पाटोदकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व विषयांमध्ये आपण स्वत: लक्ष घालणार असल्याची ग्वाही दिली. पत्रकारितेतूनच आपले करिअर सुरू झाल्याने त्यांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव आहे. सातारा जिल्ह्यातील पत्रकार संवेदनशील असल्याची आपणाला माहिती आहे. जिल्हा पत्रकार संघाने घेतलेली भूमिका निश्चित चांगली आहे. प्रशासनाला पूरक असे काम येथील मीडियाचे आहे. त्यामुळे पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास आपला प्राधान्यक्रम राहील, असेही पाटोदकर यांनी सांगितले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या