पैशाच्या वसुलीसाठी उचलले होते; सातारच्या राजवाडा परिसरात अडकले जाळ्यात
Satara News : खटाव तालुक्यातील पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टोन क्रशरवर काम करणाऱ्या इसमाला फक्त चार तासात शोधून काढण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले. या प्रकरणातील दोन्ही अपहरणकत्र्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी पुसेगाव पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.
गुरूवारी (दि. ३०) रात्री ११ च्या सुमारास पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टोन क्रशरवर काम करणारे मारुती माणिक बंडगर (वय ४६) यांना दोन इसमांनी एका लाल रंगाच्या कारमधून पळवून नेऊन त्यांना सोडण्याकरिता २० हजार रुपयांची मागणी केली असल्याबाबत जोतिबा मारुती बंडगर (रा. धावडदरे, ता. खटाव) यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानुसार भादंवि कलम ३६४ (अ), ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तात्काळ नाकाबंदीच्या सूचना
या गुन्ह्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त होताच नियंत्रण कक्ष अधिकारी यांनी जिल्हा रात्रगस्त अधिकारी, कराडचे पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांना ही माहिती दिली. त्यांनी तात्काळ सातारा जिल्ह्यात रात्रगस्तकामी हजर असलेल्या सर्व अधिकाNयांना आपापल्या पोलीस ठाणे हद्दीत सक्त नाकाबंदी करून संबंधित वर्णनाची कार मिळून आल्यास अपहृत व्यक्ती व आरोपींना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या.
त्यावेळी अपहरण करण्यात आलेली व्यक्ती व आरोपी हे सातारा येथील राजवाडा परिसरात असल्याची गोपनीय माहिती बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ व सातारा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश जगताप यांना प्राप्त झाली. त्या दृष्टीने त्यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे अपहृत व्यक्ती व आरोपींचा राजवाडा परिसरात शोध घेवून नमूद अपहृत व्यक्ती व आरोपींना ४ तासाच्या आत ताब्यात घेतले. त्यांना पुढील कारवाईकामी पुसेगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील अधिक तपास पुसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे करीत आहेत.
यांनी केली ही मोहीम फत्ते
जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, अविनाश जगताप, पोलीस हवालदार डी. डी. जाधव, पोलीस कॉन्स्टेबल व्ही. व्ही. जाधव, सहाय्यक फौजदार एस. बी. येवले, एस. जे. माने, एस. एल. मोकाशी, आर. सी. जाधव, आर. टी. जाधव यांनी ही कारवाई केली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या