Satara News : ज्यांचे जिल्हा बँकेत योगदान, त्यांनीच यावे !


विद्यमान संचालकांच्या कामाचे 'ऑडिट' रामराजे यांच्याकडे - शिवेंद्रराजे

Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोधच व्हावी. बँकेला निवडणुकीच्या खर्चात पाडले जावू नये. ज्यांनी बँकेसाठी योगदान दिले आहे, त्यांनीच संचालक मंडळात यावे, असा खोचक टोला लगावत, विद्यमान संचालकांच्या योगदानाचे 'ऑडिट' रामराजे नाईक - निंबाळकर यांच्याकडे आहे, अशी गुगली बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी टाकली आहे.

सातारा येथे निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सातारा जिल्हा बँकेची कामगिरी सर्वच आघाड्यांवर दमदार आहे. पक्षीय राजकारण बँकेत न आणता आम्ही सर्वांनी एकत्र येऊन बँक उत्तमरीत्या चालवली आहे. त्यामुळे बँकेची निवडणूक बिनविरोधच झाली पाहिजे. देशपातळीवर नावाजलेली बँक असल्याने काहीही करून संचालक मंडळाच्या बोर्डावर आपले नाव असायला पाहिजे म्हणून कोणी अट्टहास करू नये, असा सल्ला शिवेंद्रराजे यांनी यावेळी दिला.

सातारकर ‘शो’वर पडदा टाकतील

खासदार उदयनराजे यांच्यावर त्यांनी यावेळी शरसंधान साधले. शहरात उद्घाटनांची पोस्टरबाजी सुरू आहे. पाच वर्षे नगरपालिका नीट चालवली असती तर आता इतकी पोस्टरबाजी करण्याची वेळ आली नसती. या खर्चात एखादे विकासकाम झाले असते. ही सर्व नौटंकी असून सातारकर नागरिक येत्या निवडणुकीत या शो वर शेवटचा पडदा टाकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रत्येक गोष्टीत स्वप्नपूर्तीची भाषा केली जाते. पण सातारकरांची स्वप्नपूर्ती न होता त्यांचा स्वप्नभंग झाला. भ्रष्टाचारासाठी कोविडची पळवाट शोधून काढली. बहुमताच्या जोरावर रेटून नेण्याचा प्रकार सर्रास झाला. एखादे काम झाले, तर माझ्यामुळे आणि नाही झाले तर ते पाप दुसऱ्याचे असा प्रकार सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

जुन्या सिव्हिलची जागा वापरा 

सातारा शहरात शंभर बेडचे रूग्णालय होणार असून त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. राजपथावरील शाही मशिदीच्या शेजारील जुन्या सिव्हिल हॉस्पिटलची जागा त्यासाठी वापरावी असे निवेदन आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. ही जागा मध्यवस्तीत असून नागरिकांना त्याचा चांगला उपयोग होईल. हस्तांतरणालाही काही अडचण येणार नाही असे आपण त्यांना निदर्शनास आणून दिले असल्याचे शिवेंद्रराजे यांनी सांगितले.

आताच्या नगराध्यक्षांचे स्टार चांगले !

आताच्या नगराध्यक्षांचे स्टार चांगले असतील. त्यांची पत्रिका चांगली असली पाहिजे. त्यामुळे त्यांना रजेवर जावे लागले नाही. पण आधीच्या नगराध्यक्षांना रजेवर जावे लागले होते, अशी मिश्किल टिप्पणीही आमदार शिवेंद्रराजे यांनी यावेळी केली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या