Satara News : महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवणारास अटक


वडगाव निंबाळकर येथे पकडले; १ लाख १२ हजार ५५६ रूपयांचा मुद्देमाल जप्त

Satara News : महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या संशयितास वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथून खंडाळा पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडील सोन्याचे दागिने, मोटारसायकल असा एकूण १ लाख १२ हजार ५५६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. अजिंक्य अशोक शिंदे (वय २८, रा. चोपडज वाकी, ता. बारामती) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

मागील एक महिन्यापासून खंडाळा, वेळे परिसरात एक अनोळखी चोरटा मोटरसायकलवरुन येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने हातचलाखीने चोरी करत होता. याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख अयजकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना तपासाबाबत सूचना केल्या होत्या.

पाठलाग करुन ताब्यात घेतले

चोरी करणारा संशयित वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे, हवालदार सुरेश मोरे, पोलीस नाईक सचिन वीर यांचे पथक तयार करुन संशयित अजिंक्य शिंदे (रा. चोपडज वाकी, ता. बारामती) यास वडगाव निंबाळकर येथे पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने खंडाळा व भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याचे कबूल केले आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे करीत आहेत. 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या