बाळू खंदारे विषयावर शंभूराज देसाई यांनी घेतली सातारा शहर पोलिसांची झाडाझडती
Satara News : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे संपूर्ण सातारा जिल्ह्यात आपल्या साधेपणामुळे तसेच हटके कार्यपध्दतीमुळे ओळखले जातात. आजही त्यांनी असाच धक्का सातारकरांसह शहर पोलिसांनाही दिला. त्यांनी आज अचानकपणे चक्क मोटरसायकलवरून शहर पोलीस ठाण्यात जावून पोलीस ठाण्याची झाडाझडती घेतली. तेथील वातावरण पाहून देसाई यांनी शिस्त आणि कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली.
खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी सातारा पोलीस आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. नगरसेवक बाळू खंदारे याच्यावर दाखल असलेले गुन्हे, पोलीस प्रशासन राजकीय दबावापोटी करीत असलेले कामकाज याविषयी उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेतून आक्षेप घेतले होते. कदाचित या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी उदयनराजे यांनी घेतलेल्या आक्षेपांविषयी शहनिशा करण्यासाठी आज मोटरसायकलवरून पोलीस ठाणे गाठले. तेथील वातावरण पाहून त्यांनी शिस्त आणि कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली. नगरसेवक विनोद उर्फ बाळू खंदारे याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागितली असता नियुक्त कर्मचाऱ्यास व्यवस्थित सांगता न आल्याने देसाईं यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
लपवाछपवीमुळे मंत्रीमहोदय संतापले
देसाई म्हणाले, खंदारेवर गुन्हा दाखल असल्याची माहिती नाही. एका पोलीस ठाण्यात सहा वर्ष राहूनदेखील कर्मचारी रेकॉर्डवरील गुन्हेगाराची माहिती देऊ शकत नाही. अधिकारी सांगतात १८ गुन्हे, पोलीस कर्मचारी सांगतात १२ गुन्हे, सहा गुन्हे लपविण्याचे कारण काय? अशी सरबत्ती देसाई यांनी करताच, संबंधित विषय सावरुन घेत ते सहा गुन्हे प्रतिबंधात्मक स्वरूपाचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या