डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत विविध विकासकामे होणार
Satara News : सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील विविध गावांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन २०२१-२२ मधून २ कोटी रूपये मंजूर झाले आहेत. हा निधी प्राप्त करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व धनंजय मुंडे यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
यामध्ये कोरेगाव (ता. कराड) येथे मागासवर्गीय वसाहतीमध्ये बंदिस्त गटर बांधकाम करणे ५ लाख, काशिळ (ता. सातारा) येथे मागासवर्गीय वसाहतीमधील रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लाख, बोरगाव (ता. कोरेगाव) येथे मागासवर्गीय वसाहतीच्या कडेला संरक्षक भिंत बांधणे ६ लाख, पुसेसावळी (ता. खटाव) येथील मागासवर्गीय वसाहतीशेजारील ओढ्याकाठी संरक्षक भिंत बांधणे ८ लाख, शिरवडे (ता. कराड) येथे मागासवर्गीय वसाहतीमधील नंदकुमार प्रभाकर कांबळे यांच्या घरापासून ते हायस्वूâलपर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ५ लाख, मांडवे (ता. सातारा) येथे मागासवर्गीय वसाहत (मानेवस्ती व हानसेवस्ती) रस्ता व बोळ काँक्रीटीकरण करणे ५ लाख, तारगाव (ता. कोरेगाव) येथे मागासवर्गीय वसाहतीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे ८ लाख, होळीचागाव (ता. खटाव) येथील मागासवर्गीय वसाहतीमधील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे ६ लाख, कोपर्डे हवेली (ता. कराड) येथे मागासवर्गीय वसाहतीमधील रस्ता काँक्रीटीकरण करणे ८ लाख, सासपडे (ता. सातारा) येथे मागासवर्गीय वसाहतीमधील रस्ता करणे ५ लाख, सासुर्वे (ता. कोरेगाव) येथे मागासवर्गीय वसाहतीमधील अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ५ लाख, राजाचे कुर्ले (ता. खटाव) येथे मागासवगीय वसाहतीमधील रस्ता कॉक्रीटीकरण करणे ७ लाख, निगडी (ता. कराड) येथे मागासवर्गीय वसाहतीशेजारील ओढ्याकाठी संरक्षक भिंत बांधणे ७ लाख, नागठाणे (ता. सातारा) येथे मागासवगीय वसाहतीमधील रस्ता कॉक्रीटीकरण करणे ८ लाख, धामणेर (ता. कोरेगाव) येथे मातंग वसाहतीमधील बंदिस्त पाईप गटर बांधणे ८ लाख, रहाटणी (ता. खटाव) येथे मागासवर्गीय वसाहतीमधील रस्ता कॉक्रीटीकरण करणे ७ लाख, मसूर (ता. कराड) येथे मागासवर्गीय वसाहतीपासून ते स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता कॉक्रीटीकरण करणे ७ लाख, अतित (ता. सातारा) येथे मागासवर्गीय वसाहतीपासून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कॉक्रीटीकरण करणे ८ लाख, पिंपरी (ता. कोरेगाव) येथे मागासवगीय वसाहतीमधील रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ७ लाख, जयराम स्वामी वडगाव (ता. खटाव) येथे मागासवगीय वसाहतीमधील रस्ता काँक्रीटीकरण करणे ७ लाख, चरेगाव (ता. कराड) येथे मागासवगीय वसाहतीमध्ये लक्ष्मी मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे ८ लाख, नांदगाव (ता. सातारा) येथे मागासवगीय वसाहतीमधील रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लाख, साप (ता. कोरेगाव) येथे मागासवगीय वसाहतीशेजारील ओढ्याकाठी संरक्षक भिंत बांधणे ५ लाख, वांझोळी (ता. खटाव) येथे मागासवर्गीय वसाहतीमधील रस्ता कॉक्रीटीकरण करणे ७ लाख, भोसलेवाडी (ता. कराड) येथे मागासवर्गीय वसाहतीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे ८ लाख, खोजेवाडी (ता. सातारा) येथे मागासवगीय वसाहतीमधील रस्ता कॉक्रीटीकरण करणे ५ लाख, जायगाव (ता. कोरेगाव) येथे मागासवगीय वाढीव वसाहतीमधील रस्ता कॉक्रीटीकरण करणे ६ लाख, पेरले (ता. कराड) येथे मागासवर्गीय वसाहतीपासून इंदोली फाटा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ८ लाख, निसराळे (ता. सातारा) येथे मागासवर्गीय वसाहतीमधील रस्ता कांक्रीटीकरण करणे व गटर बांधकाम करणे ५ लाख, न्हावी बुद्रुक (ता. कोरेगाव) येथे मागासवर्गीय वसाहतीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे ८ लाख, वेणेगाव (ता. सातारा) येथे मागासवर्गीय वसाहतीमधील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे व गटर बांधकाम करणे ५ लाख आदी कामांचा समावेश आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या