उमेदवारीच्या अखेरच्या दिवशी शक्तीप्रदर्शन करत दिग्गजांचे अर्ज दाखल
Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर, सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, बँकेचे विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले आदी दिग्गजांनी शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, बँकेच्या तीन जागा बिनविरोध झाल्याचे आज स्पष्ट झाले. या तीनही जागा राष्ट्रवादीने मिळवल्या आहेत. बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये वाईचे आमदार मकरंद पाटील यांचा समावेश आहे.
गेली अनेक वर्षे नाबार्डकडून उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्काराने गौरवल्या गेलेल्या व राज्यातील जिल्हा बँकामधील रोल मॉडेल ठरलेल्या सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकडे जिल्ह्यासह राज्याच्या नजरा लागल्या आहेत. राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी या दिग्गजांसह अनेकांनी अर्ज दाखल केले. यानिमित्ताने साताNयात मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन पहायला मिळाले. आज रामराजे नाईक - निंबाळकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अनेकांचे अर्ज दाखल झाले.
तीनही बिनविरोध जागा राष्ट्रवादीला
दरम्यान, बँकेच्या एवूâण २१ जागांपैकी ३ जागा बिनविरोध झाल्याचे आज स्पष्ट झाले. वाईचे आमदार मकरंद पाटील हे खरेदी विक्री मतदारसंघातून, महाबळेश्वर तालुक्यातून विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून राजेंद्रशेठ राजपुरे, फलटणचे शिवरूपराजे खर्डेकर कृषी प्रक्रिया मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले आहेत. त्या त्या मतदारसंघातून अन्य कोणी उमेदवारी अर्जच न भरल्याने निवडणुकीआधीच राष्ट्रवादीने या तीन जागांसह खाते उघडले आहे. बँकेच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाNया दिवंगत विलासकाका पाटील - उंडाळकर यांचे चिरंजीव अॅड. उदयसिंह पाटील - उंडाळकर यांनी याआधीच कराड सोसायटी मतदारसंघात अर्ज दाखल केला आहे.
चित्र १० नोव्हेंबरला स्पष्ट होणार
उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होणार असून १० नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. तोपर्यंत राजकीय हालचाली आणखी गतीमान होणार आहेत. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज सकाळी दिलेल्या संकेतांप्रमाणे तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर इच्छुकांना अर्ज भरण्यास सांगण्यात आले असून आता सर्वसमावेशक संचालक बँकेत पाठविण्यासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर बैठक होणार आहे. त्यामुळे अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. निवडणूक अटळ ठरणार, की बिनविरोध होणार हे स्पष्ट होण्यासाठी अजून पंधरा दिवस वाट पहावी लागणार आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या