दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
Satara News : दाखल गुन्ह्यात मदत करतो असे सांगून २ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार रमेश कोळी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
गंभीर दुखापत केल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तक्रारदार कोळी याला भेटले. गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल असल्याने त्यासाठी ४ हजार रुपयांची मागणी केली. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात जावून तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार दाखल करुन तपासाला सुरुवात केल्यानंतर पडतपाळणीमध्ये लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले.
ट्रॅपमुळे पोलीस दलात खळबळ
तडजोडीअंती २ हजार रुपये घेण्याचे ठरले. लाचेची रक्कम घेण्याचे ठरल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ट्रॅप लावला. लाचेची रक्कम सायंकाळी घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. पोलिसावर ट्रॅप झाल्याचे समोर येताच वाईसह सातारा पोलीस दलात खळबळ उडाली. रात्री उशीरा गुन्हा दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संशयिताला अटक केली. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही लाचेची मागणी झाल्यास १०६४ या टोल प्रâी क्रमांकावर संपर्वâ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या