Satara News : चोरीच्या गुन्ह्याची सीसीटीव्ही फुटेजमुळे उकल


लोणंदमध्ये कॅश लुटणाऱ्यास पुण्यातून अटक; खंडाळ्याच्या गुन्ह्याचीही कबुली
 

Satara News : लोणंद येथे दुकानात ग्राहक म्हणून येऊन हातचलाखीने दुकानातील नवीन मोबाईल व रोकड असा २७ हजारांचा डल्ला मारल्याप्रकरणी लोणंद पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ट्रॅप करून एकाला पुण्यातून पकडले. त्याने अशाच प्रकारे खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बँकेत कॅशची चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आपल्या एच आर कॉम्पीट्रॉनिक्स या दुकानात दि. २५ सप्टेंबर रोजी ग्राहक म्हणून आलेल्या दोन इसमांनी सुट्ट्या पैशाचा बहाणा करत कपाटातील विक्रीसाठी ठेवलेला नविन विवो कंपनीचा मोबाईल व कॅश काऊंटरमधील रोख रक्कम असा एवूâण २७ हजाराचा मुद्देमाल हातचलाखीने चोरुन नेल्याची फिर्याद हर्षद रामचंद्र भुजबळ (रा. बिरोबावस्ती, लोणंद, ता. खंडाळा) यांनी दाखल केली होती. त्याआधारे लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
आरोपींचा ठावठिकाणा समजला 

या गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेवून अटक करण्याबाबतच्या सूचना फलटण विभागाचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी दिल्या होत्या. लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकासह घटनास्थळी भेट देवून तेथे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तसेच लोणंद शहरात ठिकठिकाणी लावलेल्या सीसीटीव्हीची तपासणी करुन गुन्हे प्रकटीकरण पथकास सूचना दिल्या होत्या. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने व स्वाती पवार तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी हे पुण्यातील कात्रज व हडपसर भागात राहणारे असल्याचा निष्कर्ष काढला. त्यानंतर तातडीने हालचाली करत यातील एकास ताब्यात घेतले असता त्याने वरील गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अशाच प्रकारे खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बँकेत कॅशची चोरी केल्याची कबुली दिली.

जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, स्वाती पवार, सहाय्यक फौजदार पाडवी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस नाईक संतोष नाळे, श्रीनाथ कदम, अभिजित घनवट, केतन लाळगे, अविनाश शिंदे, शिवशंकर तोटेवाड, गोविंद आंधळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या