शनिवारी रात्री ८ वाजता एकाचवेळी प्रज्वलित होणार ३६१ मशाली
Satara News : किल्ले प्रतापगड निवासिनी भवानी मातेच्या स्थापनेस सन २०१० साली ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गडावर मशाल महोत्सव सुरू करण्यात आला असून यंदाचा मशाल महोत्सव शनिवार दि. ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
प्रतापगडचे स्थानिक भूमिपुत्र चंद्रकांत उतेकर यांच्या कल्पनेतून प्रतापगडावर प्रथमत: २०१० साली ३५० मशाली प्रज्वलित करुन मशाल महोत्सव साजरा झाला. या उत्सवात चतुर्थीच्या रात्री ८ वाजता शेकडो मशाली एकाच वेळी प्रज्वलित केल्या जातात. जवळ जवळ ८ ते १० दिवस अगोदर या महोत्सवाच्या तयारीचे काम सुरु होते. असंख्य लोक या कामात आपला खारीचा वाटा उचलतात. प्रतापगडावर प्रेम करणारे अनेक शिवभक्त या कार्यक्रमात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात मदत करतात. मशाल महोत्सवासाठी लागणाऱ्या मशाली तसेच इतर साहित्याची तयारी गडावर जोरात सुरु आहे.
किल्ल्यावर अवतरणार साक्षात शिवकाल
मशाल महोत्सवानिमित्ताने मशाली प्रज्वलन, ढोल ताशा समूह वादन, नयनरम्य आतषबाजी असे चैतन्य निर्माण करणारे कार्यक्रम हे मशाल महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. कार्यक्रमावेळी जेव्हा सर्व मशाली प्रज्वलित होतात त्यावेळी साक्षात शिवकाल अवतरल्याचा भास होतो, अशी माहिती संयोजकांनी दिली. यावर्षी आई भवानीमातेच्या स्थापनेस ३५९ वर्षे पूर्ण होणार असून त्यानिमित्त शनिवार दि. ९ रोजी रात्री ८ वाजता किल्ले प्रतापगडावर ३६१ मशाली प्रज्वलित होणार आहेत.
हीच ती शिवप्रतापाची भूमी
किल्ले प्रतापगड छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेला गड आहे. छत्रपती शिवरायांनी भोरप्याच्या डोंगराला तट बुरुजांना शेला पागोटे चढवून स्वराज्यावर चालून आलेल्या अफझलखानाचा येथेच काटा काढला. हा भीम पराक्रम जिच्या कृपाशिर्वादाने प्रत्यक्षात आला तिचे स्मरण म्हणून छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर आई भवानीदेवीचे मंदिर बांधून त्या ठिकाणी आदिशक्तीची स्थापना केली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या