Satara News : ग्रामपंचायतींच्या हितासाठी विकास परिषद मैदानात


थकित वीजबिले भरण्यासाठी शासनाने स्वत: तरतूद करावी - यशवंतभाऊ भोसले

Satara News : शासनाकडून ग्राम विकासाकरिता मिळणाऱ्या निधीमधून ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची व पाणी योजनांची थकित वीजबिले भरण्याचा आदेश मागे घेण्यात यावा व यासाठी शासनाने स्वत: तरतूद करावी, अशी मागणी सातारा जिल्हा विकास परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

विकास परिषदेचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी आज याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत भोसले यांनी ही माहिती दिली. यापूर्वी ग्रामपंचायतींचा विकास निधी हा जिल्हा परिषदेकडे वर्ग केला जात होता. परंतु आता थेट ग्रामपंचायतींच्या बँक खात्यांवर थेट जमा केला जातो. हा निधी पथदिवे व पाणी योजनांच्या वीजबिलांसाठी वापरल्यास गावातील विकास कामांकरिता रक्कमच शिल्लक राहणार नाही. गावातील अंतर्गत रस्ते, गटार, जलवाहिन्यांच्या देखभालीसाठी पैसे उरणार नाहीत व गावे भकास होतील. स्वच्छ व सुंदर ग्राम योजना स्वप्नवत राहतील, याकडे भोसले यांनी लक्ष वेधले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या