Satara News : जिजामाता बँक ठेवीदारांमध्ये तीव्र असंतोष


ठेवी तात्काळ परत न मिळाल्यास आंदोलन करणार - प्रशांत आष्टीकर
 

Satara News : सातारा येथील जिजामाता महिला सहकारी बँकेतील पदाधिकाऱ्यांनी सहा वर्षांपासून ठेवीदारांना पैसे देतो, असे सांगूनही पैसे दिलेले नाहीत. यामुळे ठेवीदारांच्या भावना तीव्र झाल्या असून तात्काळ कार्यवाही न केल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा जिजामाता बँक बचाव अभियानाचे संयोजक प्रशांत आष्टीकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

प्रशांत आष्टीकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की जिजामाता बँकेत हजारो लोकांनी विश्वासाने पैसे गुंतवले आहेत. गुंतवणूकदारांमध्ये पेन्शनधारक, लहान-मोठे व्यावसायिक, प्रामुख्याने महिलांचा लक्षणीय समावेश आहे. गुंतवलेले पैसे मुदतीनंतर मिळणे हा हक्क असताना बँकेच्या अध्यक्षा, संचालक व बँकेचा सीईओ यांनी केलेल्या गलथान कारभारामुळे बँकेला टाळे लागले. यामध्ये काही जणांचा जीव गेला आहे. आजही अनेकांना मानसिक धक्का बसला आहे. शेकडो कुटुंब देशोधडीला लागली. वृध्दांना आजारपणात औषधाला पैसे नाहीत. अशा अनेक समस्या ठेवीदारांसमोर निर्माण झाल्या आहेत.

गुंतवणूकदारांच्या संयमाचा अंत

या बँकेचे विलिनीकरण होणार असल्याचा फलक बँकेच्या कार्यालयाजवळ लावण्यात आला आहे. या माध्यमातून ठेवीदारांना शांत ठेवण्याचा प्रयत्न करत त्यांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संयमाचा अंत झाला असून तात्काळ ठेवीदारांना पैसे न मिळाल्यास आंदोलन छेडले जाईल. तत्पूर्वी शासनाने बँकेच्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आष्टीकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या