Satara News : यशवंत हॉस्पिटलमध्ये आधुनिक उपकरणांचा शुभारंभ


मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान सातारा शहरात उपलब्ध

Satara News : सातारा येथील यशवंत हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक अशा ओ आर्म व न्यूरो स्पायनल नेव्हिगेशन या उपकरणांचा शुभारंभ पुण्याचे प्रसिद्ध बाल अस्थिरोग शल्य चिकित्सक डॉ. संदीप पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सातारा अस्थिशल्य चिकित्सक संघटनेमार्फत 'अस्थिरोग व मेंदूच्या शस्त्रक्रियेमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान' या विषयावर कार्यशाळादेखील आयोजित करण्यात आली.

ओ आर्म व रोबोटिक तंत्रज्ञान असणाऱ्या महाराष्ट्रातील मोजक्या रुग्णालयांमध्ये आता यशवंत हॉस्पिटलचा समावेश झाला आहे. या निमित्ताने मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेला लागणारे जगातील अत्याधुनिक व सुसज्य असे तंत्रज्ञान सातारासारख्या शहरात उपलब्ध झाले आहे. हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देताना मनस्वी आनंद व समाधान वाटत असल्याची भावना यशवंत हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. अनिल पाटील व डॉ. शुभांगी पाटील यांनी व्यक्त केली.

अचूकतेला सर्वोच्च महत्त्व 

नवीन उपकरणांमधील ओ आर्म हे उपकरण रुग्णांवर मेंदूच्या अथवा मणक्याच्या शस्त्रक्रिया सुरू असताना सीटी स्कॅन करत असल्याने शस्त्रक्रिया सुरू असतानाच अचूकतेची खात्री केली जाते. मेंदू व मणक्याची रचना अत्यंत सूक्ष्म व किचकट असल्याने त्या भागात अचूकतेला सर्वोच्च महत्त्व असते. ही अचूकता न्यूरो नेव्हिगेशन पध्दतीमुळे साध्य होत आहे. मेंदूमधील गाठ (ब्रेन ट्यूमर) किंवा रक्त स्त्राव काढत असताना तसेच मणक्यात स्क्रू व रॉड बसवत असताना त्याच्या भोवतालच्या नसा तसेच मज्जारज्जूला धक्का न लावता शस्त्रक्रिया पार पाडावी लागते. यामध्ये ओ आर्म व नेव्हिगेशन महत्वाची भूमिका पार पाडते.

आजपर्यंत डॉ. अनिल पाटील यांनी शेकडो रुग्णांवर मेंदूच्या व मणक्याच्या शस्त्रक्रिया करून त्यांना रोगमुक्त केले आहे व बNयाच जणांना मृत्यूच्या विळख्यातून बाहेर काढले आहे. सातारा जिल्हा व परिसरातील नागरिकांनी डॉ. अनिल पाटील यांचे कौशल्य व त्याच्या जोडीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्य अशा यशवंत हॉस्पिटलचा अधिकाधिक लाभ घ्यावा. या तंत्रज्ञानाचा उपयोग सर्व गरीब व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आहे, असे डॉ. शुभांगी पाटील यांनी सांगितले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या